फेसबूक पेज कसे तयार करायचे?

फेसबूक पेज कसे तयार करायचे?

हल्ली फेसबूकचा वापर महत्वाचा झाला आहे. आपल्या व्यवसायाचे / संस्थेचे / ब्रांड चे फेसबूक पेज तयार करणे गरजेचे होऊन बसले आहे. फेसबूक वेबसाईटला लॉगीन करा पेजेस वर क्लिक केल्यावर Create Page वर क्लिक करा. बिजिनेस ऑर ब्रांड चा पर्याय निवडावा पेज नेम मध्ये व्यवसायाचे नाव टाकावे व कॅटेगरी मध्ये व्यावसायाचा प्रकार निवडावा. प्रोफाईल फोटो अपलोड करा. कव्हर फोटो अपलोड करा. साधारणपणे कव्हर फोटोची कमीतकमी रुंदी ४०० पिक्सेल व उंची १५० पिक्सेल असावी, म्हणजे संगणक व मोबाईलवर ते व्यवस्थित दिसेल. Edit Page Info मध्ये अपूर्ण माहिती पूर्णपणे भरा. तुमचे फेसबूक पेज तयार झाले आहे.

संगणकावर युनिकोड वापरून मराठीत कसे टाईप करायचे?

संगणकावर युनिकोड वापरून मराठीत कसे टाईप करायचे?

संगणकावर काम करताना युनिकोड मराठीत टाईप करण्यासाठी खालील पर्याय आहेत. त्यापैकी जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही निवडावा. युनिकोड टायपिंग टूल हे टूल डाऊनलोड करण्यासाठी tdil-dc.in येथे क्लिक करा त्यानंतर टर्म्स कंडिशन ला टिकमार्क करून पुन्हा डाऊनलोड वर क्लिक करा हे टूल मोफत असून ते सर्व ठिकाणी वापरता येते. यात फोनेटिक व इंस्क्रीप्ट किबोर्ड आहेत. तसेच कोणत्या किवर चालू/बंद करायचे ते आपल्याला ठरविता येते. गुगल इनपुट टूल्स हे आता फक्त गुगल क्रोम मध्ये एक्स्टेन्शन च्या स्वरुपात वापरावे लागते. पूर्वी हे इतर गोष्टींसाठी सुद्धा वापरता येत होते. हे एक्स्टेन्शन स्थापित करण्यासाठी गुगल क्रोम उघडा व खालीलप्रमाणे पर्याय निवडा अशा पद्धतीने आपल्याला युनिकोड […]

मराठीतील व्यक्तींची नावे इंग्रजीत रुपांतरीत कशी करायची?

मराठीतील व्यक्तींची नावे इंग्रजीत रुपांतरीत कशी करायची?

ज्यावेळी आपल्याकडे व्यक्तींची नावे मराठीत आहेत व ती आपल्याला इंग्रजीत वापरायची आहेत त्यासाठी भाषांतराची (Translation) गरज नाही तर लिप्यंतरणाची (Transliteration) गरज आहे. आपण यासाठी जर भाषांतराचे टूल्स वापरले तर आपली अडचणच होते. खास याचसाठी मोफत वेबपेज तयार केले आहे त्याचा चांगला उपयोग होतो आहे. यासाठी एकावेळी काही हजार नावे जरी पेस्ट केली तरी ती व्यवस्थित लिप्यंतरीत होऊ शकतात. swapp.co.in या वेबसाईटला भेट देऊन खाली दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही या गोष्टी वापरू शकता. वर मार्क केलेल्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे असलेला युनिकोड मराठीतील पेस्ट करा व कन्व्हर्ट बटणावर क्लिक केल्यानंतर नावे इंग्रजीत दिसू लागतील.

संगणकावर व्हाटसएप कसे वापरावे?

संगणकावर व्हाटसएप कसे वापरावे?

व्हाट्सएप आपण सर्वसाधारणे मोबाईलवर एपच्या स्वरुपात वापरत असतो. परंतु काही वेळेला संगणकावर व्हाट्सएप वापरणे हे सोयीचे होते. अशावेळी आपल्याला सोप्या पद्धतीने ते करता येते. त्यासाठी आपण प्रथम मोबाईलवर नेट सुरु करावे व नंतर व्हाट्सएप एप सुरु करुन मेनू (…) मधील व्हाट्सएप वेब हा पर्याय निवडावा. खाली दाखविल्याप्रमाणे लॉगआऊटचा पर्याय आल्यास तो निवडावा. संगणकावर वेब ब्राऊजर मध्ये web.whatsapp.com ही वेबसाईट उघडावी. त्यामध्ये क्यूआर कोड एका चौकोनात दिसू लागेल. त्या चौकोनासमोर मोबाईल काही सेकंद ठेवल्यानंतर व्हाट्सएपची वेबसाईटवर आपले अकौंट उघडले जाऊन त्यावर आपल्या पोस्ट दिसू लागतील व आपण पोस्ट पाठ्वूही शकता.

इंटरनेटवर मोफत / विना कॉपीराईट वाली चित्रे कुठून डाऊनलोड करता येतील?

इंटरनेटवर मोफत / विना कॉपीराईट वाली चित्रे कुठून डाऊनलोड करता येतील?

आपल्याला बऱ्याचदा अनेक कारणांसाठी चित्रांचा उपयोग करण्याची वेळ येते त्यावेळी ती सर्व चित्रे आपल्याकडे असतातच असेही नाही, मग आपण ती सर्च इंजिनचा वापर करुन शोधू लागतो. परंतु बरीचशी चित्रे ही कॉपीराईटवाली ही असतात. खाली अशा काही वेबसाईटस दिल्या आहेत की जिथे आपणाला चित्रे शोधताही येतील आणि ती डाऊनलोडही करता येतील. १. pixabay.com एकूण चित्रांची संख्या – १० लाख + शोध कार्य – प्रगत चित्र टॅग – आहेत व्हेक्टर चित्र – आहेत डाऊनलोड करण्यासाठी लॉगीन – नाही २. stocksnap.io एकूण चित्रांची संख्या – ५० हजार+ शोध कार्य – प्रगत चित्र टॅग – आहेत व्हेक्टर चित्र – नाहीत डाऊनलोड करण्यासाठी लॉगीन – […]

संगणक / मोबाईल वर टाईप न करता कसे मराठीत लिहिता येईल?

संगणक / मोबाईल वर टाईप न करता कसे मराठीत लिहिता येईल?

संगणक / मोबाईलवर जे आपण बोलतो ते जर आपोआप टाईप होऊ लागले तर… काही वर्षांपूर्वी स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट आता शक्य झाली आहे. आपण ज्या वेगाने बोलतो त्या वेगाने शब्द टाईप होऊ लागतात. ऐंशी ते नव्वद टक्के शब्द साधारणपणे बरोबर असतात. त्यामुळे आपला बराचसा वेळही वाचतो. यासाठी आपल्याकडे गुगलचे अकौंट असावे लागते की जे साधारणपणे सर्वांचे असतेच. लॉगीन केल्यानंतर संगणकावर काम करताना गुगल ड्राईव निवडायचे. व मोबाईलवर गुगल ड्राईवचे अॅप उघडायचे. त्यानंतर न्यू बटणावर क्लिक करून गुगल डॉक्स चा पर्याय निवडावा. गुगल डॉक्स मध्ये गेल्यानंतर मेनू मध्ये टूल्सचा पर्याय मध्ये व्हॉईस टाईपिंग पर्याय निवडावा. त्यानंतर भाषा निवडावी लागते. ती खालीलप्रमाणे […]

इंटरनेटवर माहिती कशी शोधावी?

इंटरनेटवर माहिती कशी शोधावी?

इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. वेब ब्राऊजर वेब साईट सर्च इंजिन वेब ब्राऊजर वेब ब्राऊजर हे इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी वापरले जाणारे साॅफ्टवेअर आहे. खालील प्रकारचे वेब ब्राऊजर संगणक तसेच मोबाईलवर वापरले जातात. गुगल क्रोम (Google Chrome) फायरफाॅक्स (Firefox) इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) ओपेरा (Opera) वेब साईट माहिती वेबसाईट्च्या स्वरुपात वेगवेगळ्या सर्व्हरवर साठवली जाते.व त्या वेबसाईटला ओळखण्यासाठी नाव दिले जाते. खाली काही वेबसाईट्ची माहितीसाठी नावे दिली आहेत. www.swapp.co.in www.webrashtra.com www.kadwasugar.com www.karmaveerkalesugar.com www.ashoksugar.co.in सर्च इंजिन आपल्याला वेबसाईट्चे नाव माहिती असते त्यावेळी वेब ब्राऊजर मध्ये थेट वापरता येते व आपल्याला इच्छित माहिती घेता येते, परंतु ज्यावेळी आपल्याला माहिती कोणत्या […]