ऑफिसमध्ये काम करणाऱ्या किंवा इतरत्र सर्वांना संगणकावर काम करण्यासाठी एमएस-ऑफिस मध्ये काम करायची सवय असते. परंतु एमएस-ऑफिसला मोफत पर्याय काही आहे का? असा प्रश्न ज्यावेळी पडतो त्यावेळी एकच नाव समोर येतं आणि ते म्हणजे लिब्रे ऑफिस. यामध्येही त्या सर्व गोष्टी आहेत की ज्या एमएस-ऑफिसमध्ये आहेत.

आपल्याला ऑफिस वापरण्यासाठी libreoffice.org वरुन ते डाऊनलोड करावे लागेल.

लिब्रे ऑफिस मध्ये खालील सॉफ्टवेअर वापरता येतात

  • लिब्रे ऑफिस रायटर (Libre Office Writer)

याचा उपयोग पत्र, दस्तावेज करण्यासाठी एमएस-वर्ड प्रमाणे करता येतो. यामध्ये एमएस-वर्ड ची फाईल इम्पोर्ट करता येते तसेच यात तयार केलेली फाईल एमएस-वर्ड साठी एक्स्पोर्ट करता येते.

  • लिब्रे ऑफिस कॅल्क (Libre Office Calc)

याचा उपयोग स्प्रेडशीटस् तयार करण्यासाठी होतो, यामध्ये एमएस-एक्सेल ची फाईल इम्पोर्ट करता येते. यात तयार झालेली फाईल एमएस -एक्सेल साठी एक्स्पोर्टही करता येते.

तसेच खाली दिलेल्या यादीप्रमाणे आणखीही अनेक सॉफ्टवेअर्स यात आहेत.

  • लिब्रे ऑफिस इम्प्रेस (Libre Office Impress)
  • लिब्रे ऑफिस ड्रा (Libre Office Draw)
  • लिब्रे ऑफिस कॅल्क (Libre Office Calc)
  • लिब्रे ऑफिस मॅथ (Libre Office Math)
  • लिब्रे ऑफिस बेस (Libre Office Base)

0 Comments

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *