व्हाट्सएप आपण सर्वसाधारणे मोबाईलवर एपच्या स्वरुपात वापरत असतो. परंतु काही वेळेला संगणकावर व्हाट्सएप वापरणे हे सोयीचे होते. अशावेळी आपल्याला सोप्या पद्धतीने ते करता येते. त्यासाठी आपण प्रथम मोबाईलवर नेट सुरु करावे व नंतर व्हाट्सएप एप सुरु करुन मेनू (…) मधील व्हाट्सएप वेब हा पर्याय निवडावा.
खाली दाखविल्याप्रमाणे लॉगआऊटचा पर्याय आल्यास तो निवडावा.
संगणकावर वेब ब्राऊजर मध्ये web.whatsapp.com ही वेबसाईट उघडावी. त्यामध्ये क्यूआर कोड एका चौकोनात दिसू लागेल. त्या चौकोनासमोर मोबाईल काही सेकंद ठेवल्यानंतर व्हाट्सएपची वेबसाईटवर आपले अकौंट उघडले जाऊन त्यावर आपल्या पोस्ट दिसू लागतील व आपण पोस्ट पाठ्वूही शकता.