ई-कॉमर्स वेबसाईटवर ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना पेमेंट अदा करण्यासाठी ऑनलाईन पर्याय दिले लागतात. ते खालीलप्रमाणे आहेत.

 • क्रेडीट कार्ड
 • डेबिट कार्ड
 • नेट बँकिंग
 • ई-वॉलेटस
 • बँक ट्रान्सफर
 • प्रीपेड कार्ड
 • पेपाल
 • पे इंव्हॉईस
 • युपीआय

पेमेंट गेटवे हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर असून त्यांचे काम ई-कॉमर्स मर्चंट / ई बिजिनेस आणि ग्राहक यामधील ऑनलाईन पेमेंटची प्रक्रिया व ते अधिकृत करणे हे आहे. ते साधारणपणे खालीलप्रमाणे चालते.

 1. ग्राहक ई-कॉमर्स मर्चंट / ई बिजिनेस च्या वेबसाईटवर ऑर्डर देतो.
 2. ई-कॉमर्स मर्चंट / ई बिजिनेस सुरक्षितपणे ती ऑर्डर पेमेंट गेटवे ला पोहोचवतो.
 3. ग्राहक त्याच्या सोयीचा पेमेंट प्रकार निवडतो.
 4. त्यानंतर ग्राहकाच्या बँकेला तो व्यवहार पोहोचवला जातो.
 5. बँक ते ग्राहकाकडून अधिकृत करून घेते.
 6. बँकेने अधिकृत असल्यास स्वीकारते व नसल्यास ते नाकारते.
 7. पेमेंट गेटवे ते ई-कॉमर्स मर्चंट / ई बिजिनेस ला कळवते.
 8. ग्राहकाची बँक पेमेंट गेटवे बरोबर पेमेंट सेटल करते.
 9. पेमेंट गेटवे ई-कॉमर्स मर्चंट / ई बिजिनेस च्या बँके बरोबर पेमेंट सेटल करते.

पेमेंट गेटवे ची यादी खालीलप्रमाणे आहे

पेमेंट गेटवे ची सेवा घेताना खालील गोष्टी लक्षात घ्यावात

 • सेटअप फी
 • वार्षिक चार्जेस
 • व्यवहार फी

0 Comments

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *