डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचा किंवा इंटरनेटचा वापर करून केलेलं सर्व प्रकारचे मार्केटिंग. सर्च इंजिन, समाज माध्यम , ई-मेल आणि इतर वेबसाईट मधून जोडलं जाणं ही डिजिटल मार्केटिंगचाच भाग आहेत. पारंपारिक मार्केटिंग जाहिरात छपाई, फोन संपर्क आणि प्रत्यक्ष मार्केटिंग स्वरुपात अस्तित्वात आहे तर डिजिटल मार्केटिंग हे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑनलाईन स्वरुपात आहे.

१. कंटेंट मार्केटिंग

कंटेंट मार्केटिंग मध्ये ब्रांडच्या प्रसिद्धीसाठी खालील गोष्टींचा उपयोग केला जातो.

 • ब्लॉग पोस्ट
 • ई-बुक्स

२. समाज माध्यम

समाज माध्यमाच्या माध्यमातून ब्रांड आणि कंटेंट प्रमोशन केलं जाते. खाली काही समाज माध्यमांची यादी माहितीसाठी दिली आहे.

 • फेसबूक
 • व्हाट्सएप
 • इंस्टाग्राम
 • लिंक्डइन

३. ई – मेल मार्केटिंग

कंपन्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी ई-मेल मार्केटिंगचा उपयोग करतात. कंटेंट प्रमोशन, सूट आणि कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ई-मेल केला जातो. वेबसाईट वरून जर डाऊनलोड केले असेल तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठीही ई-मेल केला जातो.

४. पे पर क्लिक (PPC)

तुमच्या वेबसाईटला लोकं भेट देण्यासाठी खालील वेगवेगळ्या ठिकाणी जाहिराती देता येतात. त्या जाहिरातीवर जर कोणी क्लिक केलं तर त्याची रक्कम अदा करावी लागते.

 • गुगल पेड एड
 • फेसबूक पेड एड
 • लिंक्डइन

५. सर्च इंजिन ऑप्टीमायजेशन (SEO)

वेबसाईटचे ऑप्टीमायजेशन केल्यामुळे सर्च इंजिन वर शोधल्यावर वरच्या स्थानावर वेबपेजेस येऊ लागतात. त्यामुळे जाहिरातीचा कोणताही खर्च न करता वेबसाईट जास्त लोकं भेट देतात. खालील प्रकारचे ऑप्टीमायजेशन केले जाते.

 • ऑन पेज ऑप्टीमायजेशन

वेबपेजवरील महत्वाचे शब्द (किवर्ड) की जे अधिक शोधताना वापरले जातात व त्यावर अधिक भर देऊन त्याची माहिती अधिक व्यवस्थितपणे देण्यातूनही अधिक लोकं भेट देतात.

 • ऑफ पेज ऑप्टीमायजेशन

यामध्ये बॅकलिंकला अधिक महत्व दिले जाते. बॅकलिंक म्हणजे आपल्या वेबसाईटचा संदर्भ (लिंक) ज्यावेळी दुसऱ्या अनेक वेबसाईटवर दिली जाते त्यावेळीही आपली वेबसाईट शोधताना वरच्या स्थानावर येते.

 • तांत्रिक ऑप्टीमायजेशन

वेबसाईटच्या मागील तांत्रिक गोष्टी इमेज कॉम्प्रेशन, सीएसएस ऑप्टीमायजेशन आणि वेबसाईट लोड होताना लागणारा वेळ याचा चांगला परिणाम सर्च इंजिन वर दिसून येतो

0 Comments

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *