HOW TO

संगणक / मोबाईल वर टाईप न करता कसे मराठीत लिहिता येईल?

संगणक / मोबाईलवर जे आपण बोलतो ते जर आपोआप टाईप होऊ लागले तर…

काही वर्षांपूर्वी स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट आता शक्य झाली आहे. आपण ज्या वेगाने बोलतो त्या वेगाने शब्द टाईप होऊ लागतात. ऐंशी ते नव्वद टक्के शब्द साधारणपणे बरोबर असतात. त्यामुळे आपला बराचसा वेळही वाचतो.

यासाठी आपल्याकडे गुगलचे अकौंट असावे लागते की जे साधारणपणे सर्वांचे असतेच. लॉगीन केल्यानंतर संगणकावर काम करताना गुगल ड्राईव निवडायचे. व मोबाईलवर गुगल ड्राईवचे अॅप उघडायचे.

त्यानंतर न्यू बटणावर क्लिक करून गुगल डॉक्स चा पर्याय निवडावा. गुगल डॉक्स मध्ये गेल्यानंतर मेनू मध्ये टूल्सचा पर्याय मध्ये व्हॉईस टाईपिंग पर्याय निवडावा.

त्यानंतर भाषा निवडावी लागते. ती खालीलप्रमाणे निवडावी.

वरील माईकच्या चित्रावर क्लिक करून सुरु व बंद करता येते. जसे जसे आपण बोलत जाऊ त्याप्रमाणे टाईप होऊ लागते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Share via
Copy link
Powered by Social Snap