इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
- वेब ब्राऊजर
- वेब साईट
- सर्च इंजिन
वेब ब्राऊजर
वेब ब्राऊजर हे इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी वापरले जाणारे साॅफ्टवेअर आहे. खालील प्रकारचे वेब ब्राऊजर संगणक तसेच मोबाईलवर वापरले जातात.
- गुगल क्रोम (Google Chrome)
- फायरफाॅक्स (Firefox)
- इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer)
- ओपेरा (Opera)

वेब साईट
माहिती वेबसाईट्च्या स्वरुपात वेगवेगळ्या सर्व्हरवर साठवली जाते.व त्या वेबसाईटला ओळखण्यासाठी नाव दिले जाते. खाली काही वेबसाईट्ची माहितीसाठी नावे दिली आहेत.

सर्च इंजिन
आपल्याला वेबसाईट्चे नाव माहिती असते त्यावेळी वेब ब्राऊजर मध्ये थेट वापरता येते व आपल्याला इच्छित माहिती घेता येते, परंतु ज्यावेळी आपल्याला माहिती कोणत्या वेबसाईटवर आहे ते माहिती असत नाही त्यावेळी मात्र आपल्याला अशी वेब साईट शोधण्यासाठी सर्च इंजिन वेबसाईट्ची मदत घ्यावी लागते. खाली काही सर्च इंजिनची नावे दिली आहेत.